Tuesday, 24 June 2014

कधी येशिल रे पावसा ?


जून महीना   संपत आला तरी पावसाचा काहीच मागमुस नाही, हवामान खात   आता म्हणते की मान्सून ला अरबी समुद्रात "ना-ना "(नानौक) वादळाने अडवून धरलय,तर घडीत म्हणते की एल निनो मुळे यंदाच वर्ष हे कमी पावसाच आहे. कुणी जरी काही म्हणत असेल तरी यंदा मात्र पाऊस नाही याची खात्री आता आम्हालाच होऊ लागली आहे.
पावसाच पाणी पकडण्यासाठी आम्ही अधीर झालोय.धरणी मातेची वर्षानुवर्षाची भुजलाची भूक भागविण्यासाठी आख्ख  गाव एकत्र अालय. निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल बिघडू नये म्हणून इवलस गाव आपल्या परिन प्रयत्न करतय.आम्हाला इजा पोहोचु नये म्हणून चराईबंदी करून जनावरांना गोठयात डांबून ठेवलय. आम्हाला बाळ मिळाव म्हणुन  आमच्या पोटाशी इवलीसी झाड़ लावली आहेत. ती बिचारी देखील आता सुकू लागली  आहेत.

गेल्या वर्षी तु धो- धो कोसळला होता. तेव्हा आम्ही मात्र पूर्णत: तयार झालो नव्हतो  आता यंदाच्या वर्षी मात्र आम्ही तुझा एक थेंब देखील वाया जाऊ न देता धरणीमातेच्या पोटात साठविण्याची शपथ खाल्ली आहे.    गावकऱ्यांच्या त्यागाला आणि मृद-जलसंधारणाच्या प्रयोगाला बळ देण्यासाठी तरी तु लवकर लवकर ये !

आपलाच
डीप सी सी टी